राष्ट्रवादीने घेतलेल्या ‘या’ भूमिकेने शिवसेनेची झाली पंचाईत

sharad pawar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेससह आघाडीतला सहयोगी पक्ष कॉंग्रेस विरोधी बाकांवरच बसेल असा खुलासा काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केला. आम्हाला विरोधात बसायचाच जनादेश मिळाला आहे असं ते म्हणाले. भाजपाशी शिवसेनेनं काडीमोड घेतला तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल अशी चर्चा होत असताना आलेल्या या खुलाशामुळे शिवसेनेला आता फारशी ताठर भुमिका घेता येणं शक्य दिसत नाही.

दरम्यान, काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड आज करण्यात आली. यावेळी अजित पवार यांची विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे सर्व नुतन आमदार उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला , नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड , धनंजय मुंडे , हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिलं.

दरम्यान,भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक काल मुंबईत पक्षाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्रसिंग तोमर यांच्या उपस्थितीत झाली. चंद्रकांत पाटील यांनी पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या निवडीमुळे आता फडणविसच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे दावेदार असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

महत्वाच्या बातम्या