fbpx

राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का, रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपनेत्यांची भेटीला

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक घडामोडी पहायला मिळत आहेत. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर, माढ्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

रणजितसिंह यांचा जर भाजपप्रवेश झाला तर हा मोहिते पाटलांसह राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे.रणजितसिंह मोहिते पाटील आणि काँग्रेस नेते सुजय विखे पाटील हे दोघेही आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रणजितसिंह मोहिते पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली , विखेंपाठोपाठ मोहिते पाटील भाजपच्या गळाला लागले का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.