केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने निषेध

अंबड : राष्ट्रवादी काँग्रस डॉक्टर सेलच्या वतीने अंबड येथे मा.तहसीलदार भारस्कर यांना चंद्रपुर येथील शासकीय महाविद्यालय तथा सामान्य रग्णालयात माफक दरात रुग्णांना औषधे उपलब्ध करण्यासाठीदिनदयाल मेडीकल स्टोअर्सच्यालोकर्पण सोहळा दरम्यान सुटटीवर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मा.मंत्री महोदय म्हणाले की,केंद्रीय मंत्री महोदयांचा कार्यक्रम सोडून सुटटीवर जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर तुम्ही नक्षलवादी व्हा,आम्ही तुम्हाच्या छाताडात गोळया घालू असे वादग्रस्त विधान करुन देशभरातील वैद्यकिय क्षेत्रातील कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टरांच्या भावना दुखवल्याबददल राष्ट्रवादी कॉग्रसे डॉक्टर सेल जालना शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनात दिनांक 26 डिसेंबर 2017 रोजी जिल्हयात सर्व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे सदस्य यांनी काळया फिती लावून काम करतील असे नमुद करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष .डॉ.योगेश ढेंबरे,नगरसेवक डॉ.अविनाश वडगावकर,डॉ.राहुल बागुल,डॉ.दिपक उगले, डॉ.अरुण घुले,डॉ.विनोद जाधव,डॉ.श्रीकांत पायमोडे, डॉ.राधेशाम गायकवाड यांच्या उपस्थित स्वाक्षरीसह मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.