पुण्यात जागावाटपावरून आघाडीत बिघाडी, अजित पवारांचा प्रस्ताव कॉंग्रेसला अमान्य

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आघाडीचे पुणे शहरातील जागावाटप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले होते. पुणे शहरातील 8 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 3 तर एक जागा मित्रपक्ष लढवणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिली होती परंतु राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव कॉंग्रेसने अमान्य केला आहे.

Loading...

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मतदारसंघांबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी अशा घोषणा केल्या जातात. मात्र कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष निवडणूक लढविणार, याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेणार आहेत. हा निर्णय दिल्लीतून होईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल. आघाडी धर्म काँग्रेसकडून निभावला जाईल. सध्या जागा आणि मतदारसंघांबाबत शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहे,’असे बागवे यांनी सांगितले.

दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यातील हडपसर, पर्वती, खडकवासला, वडगाव शेरी या जागा लढणार. तर शिवाजी नगर, कसबा, कंन्टोन्मेंट या जागा काँग्रेस लढवणार तसेच कोथरुडची जागा मित्रपक्ष लढवणार आहे अशी माहिती दिली होती. परंतु त्याला कॉंग्रेसने विरोध केला आहे. तसेच या सर्व जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जागांवर विजय मिळवण्यासाठी आघाडीला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?