fbpx

लोकांचीच लेकरं कितीदिवस मांडीवर घेणार?, मुंबईत राष्ट्रवादीची पोस्टरबाजी 

टीम महाराष्ट्र देशा : नुकताच भाजपामध्ये रणजित सिंह मोहिते पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी प्रवेश केला. यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने ठीकठिकाणी ‘आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ? अशा आशयाचे बॅनर्स लावत राष्ट्रवादी काँग्रेस कडून भाजपा वर टीका करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अनेकांनी पक्षांतर करून सर्वांनाच आश्चर्य करण्यास भाग पाडले आहे. सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत टीका केली आहे.

“ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले”

“आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार” ?

बुरा न मानो होली है !

या बॅनर्स मुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे.