सिन्नरमध्ये ‘पारनेर पॅटर्न’, राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेनेचे नगरसेवक फोडले

shivsena nagarsevak

नाशिक : सिन्नर नगरपरिषदेत पारनेरची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र असून पुन्हा एकदा राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. नाशिकमधील सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना बंडखोरालाच निवडून आणले.

पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. सिन्नरमध्ये ‘त्या’ राजकीय डावपेचांची पुनरावृत्ती झाल्याने राज्याच्या राजकारणात काय पडसाद उमटतात का, हे पाहावे लागणार आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर दिग्दर्शक केदार शिंदेंनी मांडली भूमिका, म्हणाले…

सिन्नर नगरपालिकेत माजी आमदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगराध्यक्षांसह १९ नगरसेवक आहेत. तरीही शिवसेनेला उपनगराध्यक्ष निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना १५ तर प्रणाली गोळेसर(भाटजिरे) यांना १४ मते मिळाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांना एका ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहात मतदानाला न बोलवता ‘सिस्को वेबेक्स मीटिंग’द्वारे मतदान घेण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरसिंगसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. नगरसेवकांनी घरबसल्या या मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान केले. शिवसेना नगरसेवक बाळासाहेब उगले यांच्यासह गीता वरंदळ, विजया बर्डे, सुजाता तेलंग व निरुपमा शिंदे यांनी उगले यांना मतदान केल्याने निवडणूक निकालाचा कल बदलला. यानिमित्ताने नगरपालिकेत वाजे गटाला खिंडार पडल्याचे उघड झाले आहे.

पुण्यातून विधान परिषद मागायला भाजप नेत्यांच्या पायऱ्या झिजवणाऱ्यांनी चंद्रकांतदादांवर आक्षेप घ्यावा ?