राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलूख मैदानी तोफा गुरुवारी ‘किल्लारी’त धडाडणार

लातूर/प्रा.प्रदीप मुरमे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर परिवर्तन संपर्क याञा काढून ‘चला बदल घडवूया’ची साद राज्यभरातील जनतेला दिली आहे.’भाजपा-शिवसेना’ सरकारला आता बदललचं पाहिजे असा निर्धार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ‘परिवर्तन संपर्क याञा’ २४ जानेवारी रोजी गुरुवारी लातूर जिल्ह्यातील किल्लारी(ता.औसा) येथे येत असल्याची माहिती लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदूरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली.

केंद्रातील व राज्यातील हे भाजपा सरकार थापाड्या सरकार असून सर्व आघाड्यावर या सरकारला सपशेल अपयश आले आहे.या याञेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणत आहेत.यावेळी जेष्ठ नेते डॉ.पद्मसिंह पाटील,माजी उपमुख्यमंञी छगन भुजबळ, राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,फौजिया खान या राष्ट्रवादीच्या मुलूख मैदानी तोफा धडाडणार आहेत.

सायंकाळी ५ वा.होणा-या या जाहीर सभेस औसा,निलंगा व उमरगा तालुक्यातील जनतेंनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विनायक बगदूरे यांनी केले आहे.राष्ट्रवादीकडून जाहिर सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.सभा जंगी कशी होईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते जोरदारपणे कामाला लागले आहेत.