अब की बार मोदी की हार’,राष्ट्रवादीचा नवा नारा

टीम महाराष्ट्र देशा- येणाऱ्या निवडणुकीत यापुढे डिजिटल बॅनरवर फक्त एकच दिसेल ‘अब की बार मोदी की हार’ असा परिवर्तनाचा नारा कर्जतमधील सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा कर्जत येथे दाखल झाली. यावेळी ते बोलत होते.

मागील चार वर्षातील मोदींचे भाषण त्यांनाच पुन्हा ऐकवले तर स्वतः नरेंद्र मोदीच पुन्हा प्रचारालाच उतरणार नाहीत अशी परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाली आहे. मोदींची भाषणे ही चेष्टेचा विषय बनला असल्याची टीका आ. मुंडे यांनी केली.

दरम्यान,याच सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शेलक्या शब्दात सरकारवर टीका केली. गॅस कनेक्शन द्यायला निघालेत मात्र गॅस सिलेंडरची किंमत भरमसाठ वाढवण्यात येत आहे. चुलीवरच्या धुरामुळे महिलांच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत तर सिलेंडरच्या दरवाढीमुळे येत असल्याची टीका वाघ यांनी मोदी सरकारवर केली.

भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणूनच आम्हाला परिवर्तन यात्रेची सुरुवात करावी लागली आहे. त्यामुळे परिवर्तन हे नक्कीच होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...