सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीची नवी जबाबदारी

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपद तारीक अन्वर यांच्याकडे होते. तारीक अन्वर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्याजागी खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

bagdure

सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहे. आपल्या संसदीय कारकीर्दीत सुप्रिया सुळे यांनी अभ्यासू खासदार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळविले आहे. लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती, सर्वाधिक प्रश्न विचारणे, आपल्या मतदार संघातील प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करणे. हा त्यांचा स्वभाव आहे.

यामुळे उत्तम कामगिरीच्या जोरावर संसदरत्नसह विविध पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. या त्यांच्या कामगिरीसाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून अगदी अलीकडेच युनिसेफ या जागतिक संघटनेचाही पुरस्कार त्यांना मिळाला आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची बाजू लोकसभेत मांडण्याची जबाबदारी आली आहे.

 

You might also like
Comments
Loading...