राष्ट्रवादीच्या नव्या उमेदवाराची मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत उडी

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीचे सदाशिव मोटकर यांनी उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी सोमवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीमध्ये मातब्बर राजकारणी माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच माजी आमदार नितीन पाटील, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अड. देवयानी डोणगावकर, माजी आमदार संजय वाघचौरे या सर्व पक्षीय राजकारण्यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये उडी घेतल्याने आता या निवडणूकीमध्ये खुप रंगत येणार आहे. सर्व पक्षीय राजकारणी हे कोणत्या त्या कोणत्या पक्षामध्ये मंत्री, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्षांसह आदी मातब्बर मंडळी स्वत: किंवा वारसदारांना राजकारणामध्ये स्थिर करण्यासाठी सरसावले आहेत. या मध्ये ही सर्व मंडळी मोठे राजकारणी तर आहेतच सोबत बँकेच्या राजकारणातही सक्रीय आहेत. त्यामुळे सर्व मातब्बर मंडळी कधीच सामान्य माणसाला किंवा गैर राजकारणी असलेल्या उमेदवाराला बँकेच्या पायरीवर देखील उभे करत नाहीत. अशीच काहीशी परिस्थिती बँकेत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस उमेवार सदाशिव शंकर मोटकर (कन्नापूर, पैठण) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रस्थापित आणी पैश्यावाल्या उमेदवारांविरुद्ध हा उमेदवार असेल असे चित्र आता तरी दिसत आहेत.

सर्वच्या सर्व अर्ज ठरले वैध २१५ : 

सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता. तर मंगळवारी अर्ज छानणी करण्याचा दिवस होता. तर एकुण आलेल्या २१५ अर्जाची छाननी झाल्यानंतर सर्व अर्ज वैध ठरल्याचे माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी बारहाते यांनी सांगितले आहे.

 

महत्वाच्या बातम्या :