fbpx

राष्ट्रवादीचा नगर पॅटर्न, महापौर पदासाठी कॉंग्रेसचा हात सोडत भाजपला साथ

अहमदनगर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये भाजपने नाट्यमय रित्या आपला उमेदवार निवडून आणला आहे. राष्ट्रवादीने साथ दिल्याने भाजपचे बाळासाहेब वाकळे हे महापौर पदी निवडून आले आहेत.

महापौरपदासाठी भाजपाकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे तर राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर रिंगणात आहेत. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने नगरमध्ये चमत्कार होणार असल्याचं बोलल जात होत. अखेर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप – राष्ट्रवादीने एकत्र येत युती केल्याने जास्त जागा जिंकूनही सेनेला सत्तेपासून लांब रहाव लागणार आहे.

महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे वाकळे व सेनेचे बाळासाहेब बोराटे असे दोन उमेदवार रिंगणात होते. यामध्ये वाकळे यांना 37 इतकी मते मिळाली. त्यात भाजपचे 14, राष्ट्रवादीची 18, बसपा 04 अपक्ष 01 यांचा समावेश आहे.

दरम्यान, अहमदनगर पालिकेत झालेल्या भाजप – राष्ट्रवादी युतीने राज्यातील राजकारण देखील ढवळून निघणार आहे.