राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराने घेतली चंद्रकांत पाटलांची भेट; राजकीय चर्चांना उधान

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे.

सुनील तटकरे काही खासगी कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर गेले होते. मात्र त्यावेळेस नुकतेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले वैभव पिचड, चित्रा वाघ, आमदार संदीप नाईक यांची त्याठिकाणी बैठक सुरु होती.

blank

सुनील तटकरे हे पक्षप्रवेशाच्या वातावरणात आपल्या नावाची विनाकारण चर्चा नको, म्हणून क्षणाचाही विलंब न लावता बंगल्यातून लगेचच माघारी फिरले. तटकरे यांना चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर पाहून वेगवेगळ्या चर्चा मात्र रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

मराठवाडा होणार दुष्काळमुक्त, नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता

वैभव पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अकोल्यातील आदिवासी बांधवांनी काढला मोर्चा