‘आगामी लोकसभा निवडणुकीत ठाण्यात राष्ट्रवादीचाच खासदार असेल’

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या व जेष्ठ नेत्यांची बुधवारी बैठकी पार पडली.अंतर्गत कलह बाजूला ठेऊन निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश सर्वच पदाधिकाऱ्यांनी देण्यात आले आहेत. आगामी ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाण्यात राष्ट्रवादीचाच खासदार असेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ठाणे शहराचा खासदार राष्ट्रवादीचा झाल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीसह २०२२ मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये माजी मंत्री गणेश नाईक हे ठाणे लोकसभेच्या रिंगणात उतरतील ये सांगण्यात येत आहे .मागील वेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा का पराभव झाला, त्याची कारणे काय होती, आता कशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली .

1 Comment

Click here to post a comment