राष्ट्रवादीला मत देऊन आपली मते वाया घालवू नका,राष्ट्रवादीच्या आमदाराचा घरचा आहेर

टीम महाराष्ट्र देशा-  बोरखेड आणि परिसरातील मतदारांवर आपला मोठा विश्वास असून राष्ट्रवादीला मत देऊन आपली मते वाया घालवू नका. महिलांनी एका महिलेला पूर्ण ताकद देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेच्या प्रसंगी जयदत्त क्षीरसागर बोलत होते.सर्वांना बरोबर घेऊन निष्ठेने काम केले परंतू पक्षाला किंमत वाटली नाही. आघात आणि आरोप सहन केले विकास हीच जात मानून आपण राजकारणात काम केले आहे. ज्यांनी कधी गावात येऊन एखादा विकास करून दाखवला नाही तेच आज मत मागत फिरत आहेत.आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, प्रामाणिकपणे काम करतो, पुढेही कामे करायची आहेत हे सांगून युतीच्या उमेदवाराचा प्रचार करून कार्यकर्त्यांनी सर्वाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, नुकताच जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना-भाजप उमेदवारांना निवडून आणा अशी घोषणा देत जयदत्त क्षीरसागर, त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह समर्थक युती चार उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या कामाला लागले आहेत. याशिवाय जयदत्त क्षीरसागर मुंबईमध्ये थेट मातोश्री वर जाऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणखी एका युवा नेते शेखर गोरे यांनी देखील टीकास्त्र सोडत राजीनामा दिला आहे. युवा पिढीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नादी लागून आपले आयुष्य खराब करू नये, असा घणाघात गोरे यांनी केला आहे. माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बाहेरून पाठींबा देत असल्याचं गोरे यांनी घोषित केले आहे.