Share

NCP | “गेल्या ११ महिन्यांपासून…” ; अनिल देशमुखांचा जामीन मंजूर होताच राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : गेल्या ११ महिन्यांपासून ईडीच्या कोठडीमध्ये असलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अखेर मंजूर झाला आहे. कथीत 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. देशमुखांना जामीन मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस कडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. महेश तापसे (Mahesh Tapase) यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजप वर निशाणा साधला.

महेश तापसे यांची प्रतिक्रिया :

हा सत्याचा विजय झाला असल्याचं तापसे यांनी म्हटलं आहे. आज अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर झाला, आम्ही सुरुवातीपासून हेच म्हणत होतो की अनिल देशमुख यांच्यावरच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे आरोप केवळ राजकीय आरोप असून अखेर आज न्यायदेवतेने न्याय करत अनिल देशमुख यांना जामीन दिला आहे, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, असं देखील महेश तापसे म्हणाले आहेत.

गेल्या 11 महिन्यांपासून अनिल देशमुख यांना त्रास देण्यात येत होता, यात पूर्णपणे भाजपचा (BJP) हात असून ज्यांनी आरोप केले त्यांच्याकडे कोणतेच पुरावे सादर करायला नव्हते त्यामुळे आज अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे, या प्रकरणातून त्यांची निर्दोष पणे लवकरच मुक्तता होईल, असं देखील तापसे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण ?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबईतील मोठ-मोठे डान्स बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केरण्याचे आदेश देशमुखांनी दिले असल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग केला होता. याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर या प्रकरणामुळे विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. ईडीने अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांनी मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सुमारे ४.७ कोटी रुपये गोळा केले. यासोबतच देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेली रक्कम नागपुरातील श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक ट्रस्टला पुरवल्याचा आरोप ईडीने केला होता. या तपासादरम्यानच देशमुख यांना ईडीने (ED) नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : गेल्या ११ महिन्यांपासून ईडीच्या कोठडीमध्ये असलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अखेर मंजूर झाला आहे. कथीत 100 …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now