fbpx

नागराज मंजुळे प्रकरणी राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका उघड ?

rakesh kamthe and nagraj manjule

स्पेशल रिपोर्ट /टीम महाराष्ट्र देशा- कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नियमबाह्य पद्धतीने नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शुटींग साठी मैदान भाड्याने दिले असल्यामुळे विद्यार्थांना गैरसोईचा सामना करावा लागला होता. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर अखेर काल विद्यापीठाला जाग आली. आणि मंजुळे यांना ७ दिवसात शुटींगसाठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश दिले. देर आये पर दुरुस्त आये असं म्हणत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत केले, मात्र आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने नागराज मंजुळेचे काय चुकले? असा सवाल उपस्थित करत नागराजच्या समर्थनार्थ पत्रक काढले मात्र त्यांची हि भूमिका त्यांच्याच पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या आणि युवक कॉंग्रेसच्या विरोधात असल्याचं समोर आलं आहे .

अशी दाखवली होती नागराज मंजुळेंवर विद्यापीठाने मेहरबानी

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने हिंदी चित्रपटाच्या शुटींग साठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर नागराज मंजुळे यांना मैदान भाड्याने दिले. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेण आवश्यक असते. मात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हा अधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती. अखेर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस राकेश कामठे यांची पहिली भूमिका

ज्या वेळी हे प्रकरण चर्चेत आले तेव्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस राकेश कामठे यांनी विद्यार्थी हिताची भूमिका घेतली होती. विद्यापीठाच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले होते . विशेष म्हणजे राकेश कामठे यांनी विद्यापीठ प्रशासनाला २४ तासांचा अल्टीमेटम दिला होता आणि सेट उधळून लावण्याचे महाराष्ट्र देशाच्या फेसबुक लाइव्ह मध्ये जाहीरपणे सांगितले होते . त्यानंतर कुलगुरूंनी नियमांचं उल्लंघन केल्यास नागराजला दंड ठोठावण्याचं आश्वासन देखील दिले होते. आज महाराष्ट्र देशा बरोबर कामठे यांनी बोलताना आजही आम्ही विद्यार्थी हिताच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले .विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर सेट काढून टाकावा या मागणीचा पुनरुच्चार केला .

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहरची ०५/०२/२०१८ रोजीची आणि आजची भूमिका

ncp stu

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांनी कुलगुरूंची भेट घेतली तसेच मैदानावर १२० दिवस उलटून गेल्र्यानंतरही मैदानाचा वापर शुटींग सेटच्या कामासाठी होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तसेच संबंधितांकडून पुर्ण १२० दिवसाचे भाडे वसुल करण्यात यावे व ही रक्कम विध्यार्थ्यींच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान लवकारात लवकर उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी केली होती . आज महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना परदेशी यांनी या सगळ्या वादाला कुलगुरू जबाबदार आहेत त्यामुळे नागराजचे जर नुकसान होणार असेल तर ते कुलगुरुंकडून वसूल करावे तसेच कुलगुरूंवर देखील कारवाई होणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर सेट काढून टाकावा अशी मागणी केली .

राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक कॉंग्रेस यांच्या भूमिकेला छेद देणारी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाची भूमिका

babasaheb patil ncp

दरम्यान कुलगुरू डॉ करमळकर यांनी मंजुळेंच्या चित्रपटाचा सेट काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर आता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाला जाग आली असून शुटिंगसाठी शाळा, कॉलेज, विद्यापीठांनी प्रथमच जागा निर्मात्यांना दिलेल्या नाहीत, यापूर्वीही या जागा शुटींगसाठी मिळत होत्या. तरीही नागराज मंजुळे यांच्यासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परवानगी घेऊन शुटींग केले, तर काय गुन्हा केला?’ असा सवाल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी विचारला आहे. आज पुणे येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.

वास्तविक पाहता राजकारणाचा यात काहीही संबध नसताना बाबासाहेब पाटील यांनी यांनी सेना- भाजपला यामध्ये ओढले आणि आणि या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे .‘भाजप-सेना पक्षांनी चित्रपट निर्मितीची, गुंतागुंती प्रक्रिया समजावून घेऊन कलाक्षेत्रातील अडचणी समजून घेऊन या प्रश्नाकडे पाहावे, वाढीव परवानगी देणे ही तांत्रिक प्रक्रिया आहे, ती कशी पूर्ण करता येईल हे पाहावे, उगाच सेट काढावा यासाठी स्टंटबाजी करून , दडपण आणून होऊ घातलेल्या चांगल्या कलाकृतीचे नुकसान करू नये. यातून कलाक्षेत्रात चुकीचा संदेश जाईल’असं म्हणत दोन्ही पक्षांना या वादात ओढले . चित्रपट निर्मितीची प्रक्रिया हि अवघड असून सर्वांच्या वेळा जुळून येणे कठीण असते दिरंगाई झाली असेल. सेट काढून टाकला तर मोठ नुकसान होईल राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग हा नागराज मंजुळे यांच्या बाजूने आहे.अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना दिली आहे.

महाराष्ट्र देशाचे थेट सवाल

  • राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक कॉंग्रेस यांच्या भूमिकेला छेद देणारी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाची भूमिका नाही का ?
  •  केवळ नागराज मंजुळे हे नाव मोठं आहे म्हणून नियम पायदळी तुडवले जाणार आहेत का ?
  •  राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विंग्स मध्ये समन्वयाचा अभाव आहे का ?
  • वेगळी भूमिका घेवून राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादीच्या इतर संघटनांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे का ?
  • हि चमकोगिरी नाही का ?
  • राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक कॉंग्रेस यांच्या कुलगुरूंच्या राजीनाम्याच्या मागणीला सांस्कृतिक विभागाचा  पाठींबा आहे का ?
  • या सगळ्या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय ?