राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ननवरे करणार संजय शिंदे गटात प्रवेश

करमाळा : राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बोरगाव ग्रा.पं.चे उपसरपंच विनय ननवरे सध्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय (मामा) शिंदे गटात प्रवेश करणार करणार आहेत. बुधवारी १६ जानेवारीला बोरगावत प्रवेशाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. या प्रवेशामुळे करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षला (बागल गटाला) मोठा धक्का मानला जात आहे.

या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकारणावर नक्कीच परिणाम होणार असल्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे. बोरगावचे उपसरपंच विनय ननवरे यांनीच हा प्रवेश सोहळा आयोजित केला आहे. शिंदे गटात प्रवेश करणारे विनय ननवरे हे बोरगाव, संगोबा भागातील युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेल आहेत. ते आपल्यासह पोटेगाव, वाघाचीवाडी,दिलमेश्वर या गावाच्या विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन,सदस्यांसह अनेक ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्यांना घेऊन जिल्हा परीषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.

तासोबतच यावेळी विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा कपार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कावळवाडीचे सरपंच गणेश करे-पाटील तर प्रमुख प्रवक्ते सुजित बागल असणार आहेत.यासह सोलापूर जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील डझनभर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सध्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय (मामा) शिंदे हे २०१४च्या विधानसभेला थोड्या मतांनी करमाळा विधानसभेत पराभूत झाले होते. पहिली वेळ असतानाही त्यांना पडलेली मते हि प्रस्तापितांना धक्का देणारी होती. शिंदे यांनी त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करमाळा तालुक्याला निधी देऊन मोठ्याप्रमाणावर विकास चाकू केला आहे. त्याबरोबरच करमाळा शहारालगत कमलाभवानी शुगर या साखर कारखाण्याची मुहूर्तमेढ रोवुन शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न सोव्ण्याचे क्देखील केले आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अथिँक व्यवहाराची अडचण बघुन माढेश्वरी अबँन बँक असेल किंवा पंढरपूर अबँन बँक असेल या दोन बँका करमाळयात आणून करमाळा आणि त्यांचं नातं एका कुटुंबाप्रमाणे होऊ लागले आहे.