झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने वाजवले ढोल

टीम महाराष्ट्र देशा : देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली पण दिवसेंदिवस कंपन्या बंद झाल्याने अनेकांचे रोजगार हातातून निसटू लागले आहेत. या निषेधार्थ सोमवारी ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला. झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी ढोल वाजवले असले तरी वर्षावरही ढोल वाजवायला मागे हटणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिला.

भाजप सरकारच्या कार्यकाळात केवळ महाराष्ट्रातच जवळपास  १ लाख ४२ हजार कंपन्या बंद झाल्या. लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले. तरीही सरकार कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होत नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष रविकांत वर्पे , प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे – नवी मुंबई प्रभारी अभिषेक बोके, ठाणे शहराध्यक्ष मोहसीन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील आणि कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकार व भाजप सरकारचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी बूट पॉलिश, छत्री दुरुस्ती, चणेवाला असे नानाविध भूमिका साकारुन भाजप सरकारच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले.Loading…
Loading...