fbpx

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा रायगडावरुनच का?….धनंजय मुंडेंचे उत्तर

dhanjay munde

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा रायगड छत्रपती शिवाजी महारांचे आशीर्वाद घेऊन सुरु झाली आहे. सध्या ही परिवर्तन यात्रा संपूर्ण राज्यात मतदारांशी संवांद साधत फिरत आहे.

निर्धार परिवर्तन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना एका ठिकाणी एका पत्रकाराने विधान परिषेदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांना प्रशा विचारला की, राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा रायगडावरुनच का?… त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले की, ‘१७ व्या शतकात या हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये दिल्लीच्या तख्त शहा विरोधात पहिली परिवर्तनाची लढाई जर कोणी लढली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढली म्हणून हि परिवर्तनाची लढाई सुरु करताना आम्ही पहिला मनाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना केला.’

मुंडे यांच्या या उत्तराने संपूर्ण सभाग्रहात कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महारांच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा सध्या परळी जिल्ह्यात आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला जाणार आहे.

2 Comments

Click here to post a comment