सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

ncp auranga

औरंगाबाद खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो सध्या मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.Devendra Fadanvis For Maharashtra या सोशल मिडीया (फेसबुक पेज) वरील भारतीय जनता पार्टी आय.टी.सेल मार्फत मुळ फोटोमध्ये बदल करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरा ऐवजी शाळेच्या ईमारतीचा फोटो टाकून आणि सुळे यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा वापरून फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला होता .या प्रकारानंतर औरंगाबाद शहर राष्ट्रवादीने आता आक्रमक पवित्रा घेतला असून अॅडमीनवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मोदीराज यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर गुन्हा दाखल करुन घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

खा.सुप्रिया सुळे या यवतमाळ ते नागपुर हल्लाबोल पदयात्रेत सामिल असतांना दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्धा येथे सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्रदर्शनास सुप्रिया सुळे यांनी भेट दिली होती. यावेळी एका स्पर्धक युवतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तक्षरातील मजकुर खा.सुप्रिया सुळे यांना दाखविला होता. त्या प्रदर्शनातील फोटो सुप्रिया सुळे यांची प्रदर्शनास सदिच्छा भेट अशा आशयाचा मजकुर टाकून प्रदर्शित करण्यात आला होता मात्र Devendra Fadanvis For Maharashtra या सोशल मिडीया (फेसबुक पेज) वरील भारतीय जनता पार्टी आय.टी.सेल मार्फत मुळ फोटोमध्ये बदल करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षर ऐवजी शाळेच्या ईमारतीचा फोटो टाकून आणि सुळे यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा वापरून फेसबुक पेजवर पोस्ट केला होता .त्यानंतर हा फोटो बराच व्हायरल झाला होता .यावेळी राष्ट्रवादीचे सोशल मिडीया शहर जिल्हा समन्वयक विलास मगरे, मराठवाडा चिटणीस जावेद खान, ओबीसी शहराध्यक्ष गजानन सोनवणे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अबरार पटेल, आलिम पटेल, अफरोज पटेल, अख्तर पटेल, निसार खान, चांगदेव हिंगे, राहुल कावरे, अयाज डांगे यांची उपस्थिति होती

 

1 Comment

Click here to post a comment