कृष्णा भीमा स्थिरीकरण पुढील तीन पिढ्या होणार नाही : राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांची टीका

माढा : राष्ट्रवादीचे नेते म्हणून जे जिल्ह्यात वाढले. ते आता आपल्या स्वार्थासाठी भाजपात गेले. ते कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचे सांगत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही योजना होणार नाही असे अनेकदा सांगितले आहे. पुढच्या तीन पिढ्या हे स्थिरीकरण शक्य नाही असा दावा करीत, मग नक्की कोणाचे स्थिरीकरण करण्यासाठी हे भाजपात गेले? असा सवाल उपस्थित केला आणि संजय शिंदेंनी मोहिते पाटलांवर नाव न घेता टीका करत रांझणी गावातून प्रचाराला सुरुवात केली.

Loading...

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी माढ्यातील रांझणी येथील ओंकारेश्वर मंदिरातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी आमदार बबनराव शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार बबन दादा शिंदे, माजी आमदार विनायक पाटिल यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या नेतृत्वाने गेल्या दहा वर्षात अनेक चुका केल्या. त्या विरोधात मी राजकारण केले. भले भाजपच्या संपर्कात होतो मात्र पवार साहेब आणि अजित दादांच्या विचारापासून दूर गेलो नाही असे त्यांनी यावेळी म्हटले.

मोहिते पाटलांना शरद पवार यांनी दहा वर्ष राजकारणात विविध पद दिली. ग्रामीण भागात मोडीत निघालेल्या भांड्याना जसं  कलई करतात तसं कलई करून करून पवार यांनी सत्तेत टिकवलं. पण आज लोकाना समजलंय ही मोडीत निघालेली भांडी आहेत.

कलई केलेली भांडी अशी खिल्ली उडवत माढा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार ठरला नसताना संजय शिंदे यांनी आक्रमक पध्दतीने प्रचाराला सुरूवात केली.Loading…


Loading…

Loading...