fbpx

राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे, मोदी त्सुनामीमुळे बड्या नेत्यांच्या नौका बुडाल्या आहेत, आता विरोधी पक्षातील नेत्यांचा भाजपकडे ओढा वाढल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांनी काळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची ही माहिती आहे. महाडिक यांचा कोल्हापुरमधून संजय मंडलिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ४ जागांवर विजय झाला होता. त्यात धनंजय महाडिक यांचा समावेश होता. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादीला मोठा झटका बसणार आहे