राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांचा विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल…

blank

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांनी आज विधानभवनामध्ये विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बाबाजानी दुर्राणी यांना विधानसभा सदस्याद्वारा निर्वाचितमधून ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माणिकराव ठाकरे आदींसह दोन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.

अखेर नाराज जाणकरांचा हट्ट भाजपने पुरवला

जेष्ठांनो थोडं थांबा नव्याना संधी द्या – अजित पवार

केडगाव हत्याकांड प्रकरण; पोलीस कार्यालय तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीचे ४१ कार्यकर्ते पोलिसात हजर