पुनम महाजन यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे खुले पत्र; ‘या’ प्रश्नांची विचारली उत्तरे

टीम महाराष्ट्र देशा – भाजपच्या विद्यमान खासदार पुनम महाजन यांना राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने खुले पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी महाजन यांना काही प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे देण्याचे आव्हान केले आहे. ते पत्र आम्ही तुम्हाला जसाच तसे देत आहोत.

 

मा.पुनमताई महाजन…
खासदार उत्तर -मध्य मुंबई
आपणास खुले पत्र…

पत्र लिहण्यास कारण की तीन दिवसांपुर्वी सी.एम.चषक नावा खाली विविध स्पर्धा मुंबईतील सोमय्या मैदान मध्ये घेण्यात आल्या. त्यावेळी समोर तथाकथित देशभक्तीचा कडक गांजा ओढून नाचणाऱ्या जमावापुढे बोलताना आपण अतिशय आक्षेपार्ह विधाने केली. आपले वडील दिवंगत प्रमोद महाजन हे सभानैपुण्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यांची वक्तृत्वशैली अफलातून होती. मंत्रमुग्ध होऊन विरोधकही त्यांची भाषणे ऐकत असत. पण त्यांना आपल्यासारखा वाचाळपणा करण्याची गरज पडली नाही. याची कारणे म्हणजे स्व. वसंतराव भागवतांचा ‘माधव’ पॅटर्न महाराष्ट्रात राबविताना त्यांनी खेड्यापाड्यात फिरुन चपला झिजविल्या होत्या. मराठी माणसाच्या मनात अढळ स्थान मिळविले. पण बापाच्या लौकीकात भर टाकायची सोडून आपण अतिशय उथळपणे भाषणे करु लागलात. स्व. प्रमोदजींचा आत्मा अक्षरशः तळमळला असेल.

आपण आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेबांना “शकुनी मामा ” म्हणालात. चला यानिमित्ताने आपणास महाभारत माहित आहे एवढं तरी जगाला समजलं. भावंडामध्ये झालेल्या युद्धाची ती कहाणी आहे. आपण महाभारताचीच उदाहरणे,उपमा देऊ शकता. यात आपली चूक नाही. आपण लहानपणापासून हे असले महाभारत घरातच पाहत आलाय. त्याचा आपल्या बालमनावर परिणाम झालेला असावा. आपल्याप्रती पुरेपूर सहानुभूती बाळगून काही प्रश्न विचारतोय. उत्तरे नक्की द्या.

Loading...

• गेल्या वर्षी आदिवासी, शेतकरी नाशिक वरून मुंबईला (२०० किलोमीटरवरुन) आले होते.ते तुम्हाला कोणत्या अँगलने नक्षलवादी दिसले ?

● आपले वडिल दिवंगत प्रमोद महाजन ह्यांना त्यांचा भाऊ प्रविण महाजनने गोळ्या घालुन ठार का मारले?
● सारंगी प्रविण महाजन प्रकरण काय आहे?
• शिवानी भटनागर प्रकरण तुम्हाला आठवते का ?
● प्रविण महाजन ने लिहिलेले पुस्तक गेले कुठे?
● आपले मोठे बंधु राहुल महाजन अंमली पदार्थांचे सेवन करीत आसताना पकडले गेले. त्या वेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपले राजकीय वजन वापरून सोडवले होते हे आपण विसरलात का?
• आपल्या वडीलांचे अतिशय विश्वासू असणाऱ्या विवेक मैत्राचे काय झाले?
● राहुल महाजन ने प्रथम लग्न केले.पत्नी त्रास देते म्हणुन सोडून का गेली ?
● राहुल महाजन ने टिव्ही वर लग्न जमवले ती पण मुलगी सोडून का गेली ?
या प्रश्नाचे उत्तर आपण नक्की द्या…
मयत व्यक्तीबाबत आपण चांगले बोलतो. पण तरीही विचारतो की
आपले वडिल दिवंगत प्रमोद महाजन हे दूरसंचार मंत्री असतानाच रिलायन्सची भरभराट कशी झाली? नफ्यातले बीएसएनएल गाळात कसे गेले ? उत्तर देता येत नसेल तर हे जरा भारतातील विविध टेलिफोन आधिकारी ते चतुर्थ श्रेणी कामगारांना विचारा ..

Loading...

मग समजेल आपल्या वडिलांनी काय केले टेलिफोन चे…
आपली भारतीय संस्कृती आहे, जेष्ठ व्यक्ती चा सन्मान राखणे व आदरयुक्त बोलणे हे अपेक्षित असते.
पण भाजपा मधील वाचाळवीर ना संस्कृती व मानसन्मान राहिला आहे…
आता दोन आठवड्यापुर्वी अमेरिकेतील एक हॅकर ने आपले मामा दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हत्येचा खुलासा केला त्यावेळी आपली जीभ उचलली नाही..

Loading...

आपण मूग गिळून बसला होता..
आम्हाला वाटले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा मुशीत असले संस्कार व सुसंस्कृतपणा शिकवतात का?
पण आता कळले काय शिक्षण देतात…
मा.पुनमताई महाजन जरा आदरणीय सुप्रियाताई सुळे व आदरणीय प्रियंका गांधी कडुन संस्कार शिका..
बघा दोघी दिग्गज व्यक्तींच्या मुली असुन संस्कार बघा..
त्या पण राजकारण करतात, टिका करतात पण मानसन्मान व आदर ठेवूनच
वाटले तर आम्ही सुप्रियाताई सुळे व आदरणीय प्रियंका गांधी ना विनंती करतो आपणास प्रशिक्षण देण्यासाठी…

प्रसिध्दीसाठी वाचाळवीर होऊ नका..
आपल्या पक्षातील जेष्ठ मंत्री आदरणीय नितिन गडकरींनी गेल्याच महिन्यात जाहिर सभेत भाजपाच्या पदाधिकार्यांना कानपिचक्या दिला आहे
वाचाळवीर होऊ नका म्हणुन…
शब्द जपुन वापरा…
मा.पुनमताई महाजन आपल्या वडिलांचे म्हणजेच दिवंगत प्रमोद महाजनांचे गुरूस्थानी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते याची आठवण पत्राच्या शेवटी करुन देतो.

अक्षय होळकर ( सोशल मिडिया राष्ट्रवादी  बारामती तालुका उपाध्यक्ष)