‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’

blank

पुणे : बाजारात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी युवककडून ‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने पुणे शहरात विविध ठिकाणी थेट कांदे विक्रीसाठी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

या उपक्रमाची सुरवात आज कर्वेनगर येथे करण्यात आली यावेळेस शहराध्यक्ष राकेश कामठे, उपाध्यक्ष प्रविण दुधाने, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष विजय डाकले, आनंद तांबे, माणिकशेठ दुधाणे, बाळासाहेब बराटे, मनोज पाचपुते, उर्मिला गायकवाड, नंदिनी पानेकर, निखिल बटवाल, विकी वाघे, चारुदत्त घाटगे, संजय खोपडे, स्वप्नील खवले तसेच कर्वेनगर भागातील नागरीक उपस्थित होते.

घाऊक बाजारात कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कांदा न विकता थेट जनतेला विकावा व अर्थिक नुकसान टाळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष राकेश कामठे यांनी सांगितले.