मी पुन्हा येणार ! तुमच्या कोंबड्या चोरताना पहायला, मुख्यमंत्र्याविरोधात कोल्हापुरात पोस्टरबाजी

टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये पुन्हा सत्तेवर येण्याचा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात दौरा करत आहेत. शेवटच्या टप्यात हि यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये सुरु आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या
महाजनादेश यात्रेला होर्डिंग्जद्वारे विरोध करण्यात आला  आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याला उपहासात्मक टोला पोस्टरद्वारे लगावण्यात आला आहे.

‘मी पस्तावतोय’ अशी टॅगलाईन राष्ट्रवादीच्या बॅनरवर लिहिण्यात आली आहे.

महापूर, कांदा आयात, गड-किल्ले , कर्जमाफी, कडकनाथ घोटाळा यांचा उल्लेख फ्लेक्सवर
करण्यात आला आहे.