राष्ट्रवादी युवक नाशिक जिल्हा युवा जोडो अभियानास प्रारंभ

ncp

नाशिक : राष्ट्रवादी युवक ही राज्यात ५००० गावांमध्ये राबवण्याची संकल्पना महाराष्ट्रभर राबवण्यात येणार असल्याने ४ व ५ नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाभर शाखा उद्घाटन करण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील सिन्नर येथुन ह्या अभियानास सुरूवात होणार आहे त्यानंतर सिन्नर शहरात चौक सभा घेवुन नाशिक तालुका व निफाड तालुक्यातील शाखा उद्घाटन कार्यक्रम होवुन निफाड व विंचुर येथे रोड शो घेण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी दिंडोरी येथे चौक सभा व त्यानंतर कळवण तालुका येथील २० शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असुन देवळा शहरात भव्य चौक सभेने समारोप करण्यात येणार असल्याचे माहिती युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी दिली.

जिल्ह्य़ातील शेतकरी नोटबंदी ,पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढ, लोडशेडिंग, जीएसटी (GST) नंतर महागाईने त्रस्त झाली आहे. कर्जमुक्ती मुक्तफळे सरकारच्या रोज बदलणा-या धोरणांमुळे गाढवावर बसून त्याला फक्त गवत दाखवायचे व ते पुढे चालत रहाते अशा प्रकारे वागत आहेत. युवा ,व्यावसायिक, युवा शेतकरी सुद्धा आता जीवन संपवण्याच्या दिशेने विचार करत आहेत. ह्या तीव्र असंतोषाला सामोरे जाताना आता जनतेपुढे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच पर्याय पुढे येत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. प्रत्येक गावात जाऊन शरद पवार साहेबांचे विचार त्यांची पुढील ध्येय धोरणे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ह्या अभियाना मार्फत पोहोचतील असा विश्वास असल्याचे मत कडलग यांनी व्यक्त करत हा पहिला टप्पा असुन दुस-या टप्प्यात अजुन ५०० शाखा उघड्याचा मानस असल्याचे सांगितले.