मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पंतप्रधान मोदींना एक कोटी पत्र पाठवण्याची मोहिम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन १० जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्र पाठवण्यात येणार आहे. या पत्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी ही माहिती दिली.

या संदर्भात मेहबूब शेख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या अभियानाची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे हाच विचार लक्षात घेत. उद्या १० जून रोजी पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून ‘एक कोटी’ पत्र लिहिण्याची मोहीम हाती घेत आहोत. युवकांच्या उज्वल भविष्यासाठी एक कोटी पत्र लिहीत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपण पण ‘युवकांच्या उज्वल भविष्यासाठी एक पत्र’ या मोहिमेत सहभागी व्हा!’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसचे पदाधिकारी ही पत्रे पाठवणार आहेत. यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील मेहबूब शेख यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनही नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

IMP