fbpx

धरण खेकड्यांनी फोडल्याचा दावा करणाऱ्या सावंतांच्या घराबाहेर सोडले खेकडे

पुणे : नुकतीच रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर या धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचं जलसंधारणमंत्री तानाजी सावंत म्हटलं होतं. धरणफुटीसाठी खेकडे जबाबदार असल्याचा अजब दावा सावंत यांना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे सोडले. दरम्यान,सावंत यांच्या खेकड्यांबाबतच्या वक्तव्यानंतर त्यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर काही खेकडे पकडून पोलिसांच्या हवाली केले आणि कारवाई करण्यास सांगितलं.त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर भागात विविध पक्ष आणि संघटनाही याबाबत आंदोलन करताना दिसत आहेत.