उपराष्ट्रपतींच्या स्वागताला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक

पुणे: नव्याने बांधण्यात आलेल्या पुणे महापालिका नवीन इमारतीचा उदघाटन समारंभ सध्या सुरू आहे, उद्घाटनाला उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना कार्यक्रमातून डावलण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून पक्षाचे पदाधिकारी हे बाहेरूनच उपराष्ट्रपतींचे स्वागत करणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले, उपराष्ट्रपती पहिल्यांदाच या शहरात येत आहेत. त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादीच्यावतीने उपराष्ट्रपतींचे स्वागत करायचे होते. मात्र पोलिसांनी आम्हाला इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ थांबू न देता दूर हाकलून दिले. आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही. आम्हाला फक्त स्वागत करायचे होते. कदाचित पोलिसांना सत्ताधाऱ्यांनी सांगितले असेल. इमारतीच्या कौन्सिलवर ज्यांच्या हस्ते इमारतीचे भुमीपुजन झाले त्यांचे नाव टाकण्यात आले नाही. हा सत्ताधाऱ्यांचा करंटेपणा आहे.

मोदींच्या काळात संविधान धोक्यात : शरद पवार