अहमदनगर पुन्हा हादरले; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह भावाची गोळ्या घालून हत्या

आज जामखेड बंदची हाक

नगर: अहमदनगरमधील शिवसैनिकांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आता आणखीन एक खळबळजनक घटना घडली आहे, जामखेडमध्ये योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोन भावांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. योगेश राळेभात हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होता.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

जामखेडमधील मार्केटयार्ड परिसरात सायंकाळी ६ ते ६:३० च्या दरम्यान हि घटना घडली, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी राळेभात यांच्यावर गोळीबार केला. दोन्ही हल्लेखोरांनी तोंडाला गुंडाळले असल्याने त्यांची ओळख पटली नाही. या  हत्याकांड प्रकरणी आज जामखेड बंद पुकारण्यात आला आहे. अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थिती रहाणार आहेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह त्याच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरचा बिहार झालाय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Shivjal