राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना खुले पत्र !

माढा : माढा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारीवरून जोरदार खल चालू आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष्याचा अद्याप उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. परंतु माढा लोकसभा मतदार संघात सध्या सर्वसामान्य जनतेमध्ये जी चर्चा चालू आहे टी कशाप्रकारे आहे, याबाबत विजय शंकरराव पिसाळ या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना खुले लिहिले आहे. त्यांना तसे WhatsApp देखील केले आहे. तेच ते पत्र आम्ही तुम्हाला जसे आहे तसे देत आहोत.

आदरणीय,
मा. श्री जयंत पाटील साहेब,
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष महाराष्ट्र
विषय : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वरून चाललेल्या चर्चे बाबत !

महोदय,
मी राष्ट्रवादी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता असून, लहाणपणा पासून पवार साहेबांच्या विचारांनी प्रभावीत झालो आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात जी उमेदवारी वरून सामान्य लोकांत चर्चा सुरू आहे. ती आपल्या कानावर घालावी असे वाटते, म्हणून हे खूले पत्र आपणास लिहित आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली तेंव्हा पासून सामान्य लोकांना एक प्रश्न पडतोय तो म्हणजे विजयदादांचे काय? महाडीक, उदयनराजे यांनांही वेळोवेळी पक्षातील स्थानिकांचा विरोध होता. पण त्या ठिकाणी समेट घडवून उमेदवारी निश्चित करण्यात आली.

माढा मतदार संघात समजा प्रभाकर देशमुख साहेबांना उमेदवारी दिली गेली तर त्याचे काय परिणाम होतील व पक्षाला काय फायदा किंवा तोटा होईल हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.समजा विजयदादांना डावलले गेले व कदाचित दादांनी भाजपाकडून लढायचा निर्णय केला तर, दादांना मानणारा व भाजपला मानणारा वर्ग हा एकत्र आला तर, राष्ट्रवादीची हक्काची सीट विनाकारण धोक्यात जातेय. पंढरपूरमध्ये दादांचा पक्षातीलच लोकांनी केलेल्या पराभवातून दादांना जनतेमध्ये सहानुभूती आहे व करमाळ्यात माढ्यातही पंढरपूरमध्ये दादांनाही मानणारे छोटेमोठे गट दादांचे काम करतील हे नक्की आहे. माणमध्ये सुद्धा दादांना मानणारा वर्ग आहे व देशमुख साहेबांच्या विरोधातील मंडळी दादांनाच सपोर्ट करतील असे वाटते.

लोकसभेसाठी जरी ६ तालुके असले व राष्ट्रवादीच्या हक्काचे त्यातील फलटण, माढा व मा़ळशिरसचे आमदार असले तरीदेखील माळशिरस हे दादांचे होमपीच आहे. इथून दादांना सहानुभूती मिळून दादा ८० हजारा पेक्षा लिड घेतील. सामान्य लोकांमध्ये विजयदांना सहानुभूती आहे हे नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारी वरून दादा नाराज झाले व दुसऱ्या पक्षातून लढले तर विधानसभेचे ३ ते ४ मदारसंघ नक्कीच अडचणीत येतील व एका चुकीमुळे पक्षाची मोठ्या प्रमाणात हानी होईल.
मी मोहिते पाटीलांची वकीली करतोय असे कृपया समजू नये, तर याठिकाणी जी चर्चा होते. जी परिस्तिथी आहे. लोकात कुजबुज होते त्यावरून मी माझे मत मांडत आहे.

माझे प्रेम पवार साहेबांवर व राष्ट्रवादी पक्षावर नक्कीच मनापासून प्रेम आहे व राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रासह देशात सत्तेवर यावा आणि सामान्य लोकांची शेतकर्यांची कामे व्हावीत म्हणून मी आपणास खूले पत्र पाठवत आहे .
शेवटी पक्ष कार्यकर्ता म्हणून जो उमेदवार राहिल त्याचे काम आम्ही तन-मन-धनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता करू यात तिळमात्र शंका नाही.

मात्र पक्षाला फटका बसू नये म्हणून हा लेखन प्रपंच !

आपला विश्वासू
विजय शंकरराव पिसाळ
नातेपुते, ता.माळशिरस .

You might also like
Comments
Loading...