fbpx

‘अजित दादा हसतात’; राष्ट्रवादी युवतींनी पाठवले राज ठाकरेंना फोटो

ajit pawar & raj thackeray

”न हसायला आपण काय अजित पवार आहोत का, म्हणत ते कधी हसलेत का” अशी मिश्किल टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावर आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे यांनी थेट अजित दादांचे हसण्याचे अनेक फोटो राज ठाकरेंना भेट म्हणून पाठवले आहेत. या गिफ्टसोबत एक पत्र पाठवून ठाकरे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या नकलाकारीवर टीका करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी नकला करण्यापेक्षा अजित पवार यांच्याप्रमाणे जनतेचे प्रश्न गांभीर्याने समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तसेच अजित दादा हे जनतेचे नेते आहेत म्हणूनच नागरीक त्यांना भरघोस मतांनी निवडून देते. असे सांगत नलावडे यांनी अजितदादा यांना 1999 पासून ते 2014 पर्यंतच्या निवडणुकीत किती मते मिळाली याची आकडेवारीच राज यांना पाठवली आहे.