fbpx

मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं – रुपाली चाकणकर 

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी कोल्हापूर व सांगलीमधील पूरस्थितीची पाहणी केली आहे, यावेळी कागल, मुस्लिम बोर्डींग, चित्रदुर्ग मठ, बापट कॅम्प, जाधववाडी, कुंभार गल्ली आदि पूरग्रस्त भागाचा दौरा करून याठिकाणी थांबलेल्या पूरग्रस्तांची विचारपूस केली. मंत्री गिरीश महाजन सेल्फी काढण्यात दंग होते. तर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे कुठेही फिरकल्या नाहीत. त्यामुळे आता जनताच सरकारला धडा शिकवेल, अशी टीकाही चाकणकर यांनी केली.

राज्यामध्ये पूरस्थिती तरीही सत्ताधारी भाजपची पुन्हा महाजनादेश यात्रा

कोल्हापूर, सांगली तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे, पाऊसाने उसंत घेतल्याने पुराचे पाणी कमी होण्यास काहीशी सुरुवात झाली आहे. राज्यावर संकट ओढवलेले असताना सरकार ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप केला जात आहे, यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनदेशा यात्रा २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळी भागात यात्रा काढण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या