लक्षात घ्या!…नाहीतर कार्यकर्ते घरपोच सेवा देतील ; राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षांचा इशारा

blank

टीम महाराष्ट्र देशा :  सोशल मिडीयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांविरोधात अश्लील किंवा बेताल वक्तव्य कराल तर कायदेशीर गुन्हा दाखल करूच. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरपोच सेवाही देतील असा धमकीवजा इशारा पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपला व्हिडीओ अपलोड केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दात पोस्ट केली होती. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाचा शोध घेत त्याला बेदम चोप दिला. आणि माफीही मागायला लावली. याचपार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात पोस्ट करणाऱ्या त्या तरुणाची तक्रार पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.

याचबरोबर, फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी आपला व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी इथुन पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे तासेचं पक्षाच्या कोणत्याही नेत्यांबद्दल अश्लील किंव्हा बेताल वक्तव्य कराल तर कायदेशीर गुन्हा दाखल करूच पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहुणचारासाठी घरपोच सेवा देऊन विचारपूस देखील करतील याचीही दखल घ्यावी. ही माहितीसाठी एक झलक आहे. असे त्यांनी म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, आम्ही महिला समाजकारण, राजकारण किंवा इतर प्रत्येक क्षेञात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत असताना कर्तृत्व आणि नेतृत्व पणाला लावत असतो, याचा अर्थ आमच्यावर किळसवाणी टिका करावी, याचा अधिकार दिला कोणी या विकृत मानसिकतेला? असा सवालही त्यांनी केला. तसेच समाजाची ही विकृती आजच्या तरूणाईची माथी भडकवतात. समाजाला लागलेली ही किड नाहीशी व्हावी यासाठी इथुन मागे देखील अनेक वेळा कायदेशीर रित्या आम्ही मार्ग अवलंबत आहोत पण आता हे शांत बसणं अशक्य होत आहे. कमजोर कधीच नव्हतो पण संस्कार बरोबर घेऊन वाटचाल करतोय म्हणून विचारांनी लढत होतो. असेही त्यांनी म्हंटले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांची फेसबुक पोस्ट 

आदरणीय खा.सुप्रियाताई सुळे यांच्या आजच्या मुलाखती नंतर फेसबुक पोस्ट वर कोल्हापूर येथील अक्षय तांबवेकर याने अतिशय गलिच्छ कमेंट केली. विचारांची लढाई विचारांनीच लढावी इतकीच माफक अपेक्षा आहे तरीसुद्धा महिलांविषयी सातत्याने बेताल आणि अतिशय किळसवाणी वक्तव्य होत असतात.आम्ही महिला समाजकारण,राजकारण किंवा इतर प्रत्येक क्षेञात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत असताना कर्तृत्व आणि नेतृत्व पणाला लावत असतो,याचा अर्थ आमच्यावर किळसवाणी टिका करावी, याचा अधिकार दिला कोणी या विकृत मानसिकतेला????

समाजाची हि विकृती आजच्या तरूणाईची माथी भडकवतात. समाजाला लागलेली हि किड नाहीशी व्हावी यासाठी इथुन मागे देखील अनेक वेळा कायदेशीर रीत्या आम्ही मार्ग अवलंबत आहोत पण आता हे शांत बसणं अशक्य होतंय.
कमजोर कधीच नव्हतो पण संस्कार बरोबर घेऊन वाटचाल करतोय म्हणून विचारांनी लढत होतो.

इथुन पुढे आदरणीय साहेब,आदरणीय अजितदादा,आदरणीय खा.सुप्रियाताई सुळे ,आदरणीय धनंजय मुंडे व पक्षाच्या कोणत्याही नेत्यांबद्दल अश्लील व बेताल वक्तव्य कराल तर कायदेशीर गुन्हा दाखल करूच पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहुणचारासाठी घरपोच सेवा देऊन विचारपूस देखील करतील याचीही दखल घ्यावी.  माहितीसाठी एक झलक.
#इशारा