पुण्यात असेही रक्षाबंधन …

पुणे : ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देत पुणे शहर राष्ट्रवादी युवतींनी झाडांना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी केली . झाडे,वृक्षांमुळे आपल्याला ऑक्सीजन मिळतो याचाच अर्थ आपले मुख्य संरक्षक ही झाडे, वृक्ष आहेत आणि ह्याच भावनेतून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने झाडांना राखी बांधून ती जपली पाहिजे त्यांचे संवर्धन केले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी युवतींनी केला.
या कार्यक्रमाचे संयोजन युवती सदस्य विणा कात्रे हिने केले होते .यावेळी युवती पुणे शहर अध्यक्ष मनाली भिलारे व पदाधिकारी मेघा पंडित, अश्विनी सावंत,मयूरी हांडोरे, अमृता इप्पर, कृतीका आवटे, अक्षता राजगुरू उपस्थित होत्या .
युवती अध्यक्ष मनाली भिलारे यांनी संवाद साधताना म्हटले “जागतिक तापमानवाढ, हवामान बदल चे संकट समोर असताना आपल्या सभोतालच्या पर्यावरणाचा समतोल साधणे अधिकाधिक गरजेचे झाले आहे . प्रत्येकाने त्यासाठी जबाबदारी घेतली पाहिजे . याचे भान राखत युवती संघटनेच्यावतीने ह्या कार्यकर्माचे आयोजन केले आहे.”