‘बारामती कालही आमची होती… आजही आमची आहे… आणि उद्याही आमचीच राहील’

टीम महाराष्ट्र देशा – ‘बारामती कालही आमची होती… आजही आमची आहे… आणि उद्याही आमचीच राहील’ असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीत मतदान करणारे अजित पवार पहिले मतदार होते. हवा बदलत आहे. राज्यातील निम्या जागा आम्ही जिंकू असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मी आमदारकीसाठी उभा राहिलो, त्यावेळी मोदींनी बारामतीत सभा घेतली, जवळ-जवळ पाऊणलाख लोकं त्यांच्या सभेला हजर होती. तरीही, मी 1 लाख मतांनी निवडून आलो, असेही अजित पवार यांनी म्हटले. त्यामुळे, बारामतीत भाजपा जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, पण जर भाजपा हरली तर भाजपाने राजकारण सोडून द्यावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (मंगळवारी) राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. सुमारे अडीच कोटी मतदार २४९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानयंत्रात बंद करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण ११६ जागांसाठी मतकौल दिला जाणार आहे. ईव्हीएमवर समाजवादी पक्षाने शंका उपस्थित करत ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत जात आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.Loading…
Loading...