fbpx

बळीराजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी आता स्वस्थ बसणार नाही – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : बळीराजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी आता स्वस्थ बसणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत आहेत,

दरम्यान, शेतकऱ्यांच्या सरकसकट कर्जमाफीवरून कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्य सरकारवर निशाणा साधला. फसव्या आकडेवारीपेक्षा फडणवीस सरकारला बळीराजाची खरंच काळजी वाटत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी व योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

इतकेच नव्हे तर, या मागणीसाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजीही केली. तसेच बळीराजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी आता स्वस्थ बसणार नाही. असा नाराही त्यांनी दिला.