राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार : शरद पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

blank

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्षावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ नोव्हेंबर रोजी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक बोलवल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

सत्ता संघर्षच्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या या बैठकीच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चना उधान आले आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, ‘ १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक बोलवली आहे असून मला त्याबद्दल जास्त माहिती नाहीये. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारा ते अधिक माहिती सांगतील. मला सुद्धा बैठकीसाठी फोन आला आहे आणि या बैठकीला उपस्थित राहणार आहे.”

शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच दोन्ही पक्षांतील तणाव अधिक वाढला आहे. या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ नोव्हेंबर रोजी बोलावलेल्या बैठकीत शरद पवार नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर पवार शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं मन वळवतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं मिळून सरकार स्थापन होऊ शकतं. मात्र, या संदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या :