२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी करणार हल्लाबोल आंदोलन

सरकारच्या विरोधात रान पेटवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज

मुंबई – ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण यात सरकार अपयशी ठरलं असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांचेही मोठे हाल झालेत. याविरोधात आम्ही येणाऱ्या 25 तारखेपासून हल्लाबोल आंदोलन सुरू करणार आहोत, असं अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करणार आहे. १ डिसेंबरपासून पदयात्रा सुरू करण्यात येणार आहे. यवतमाळपासून शेतकरी आणि त्रस्त नागरिकांची दिंडी काढण्यात येणार असून सरकारच्या विरोधात रान पेटवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसल्याच पवार यांनी सांगितल.

You might also like
Comments
Loading...