राष्ट्रवादी कॉंग्रेस ईडीचं नाव पुढे करून मतं मागत आहे : फडणवीस

cm devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा आता अंतिम टप्यात आल्या आहेत. त्यामुळे आज मुंबई येथील बीकेसी मैदानावर महायुतीची संयुक्त सभा पार पडली. या सभेल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही मंचावर उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक ही केवळ औपचारिकता राहिला आहे. कारण विरोधकांनी आखाड्यात उतरण्या आधीचं हार मानली आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे नेमके कोणाच्या प्रचारासाठी आले होते. हेच कळालं नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसही आता अनुकंपा योजेने सारखे मत मागत फिरत आहे.

शरद पवार म्हणतात आम्ही लहान मुलांशी लढत नाही. मात्र त्यांना आता कळून चुकलयं की, ही लहान मुलं प्रत्येक निवडणुकीत चारीमुंड्या चीत करत आहेत. त्यामुळे ते ही आता ईडीचं नाव पुढे करून मतं मागत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. राज्यात सर्वांगीण विकास होत आहे. शहरी असो की ग्रामीण या सर्व स्तरावर जोरदार विकास होत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या शांत होणार आहेत. त्यामुळे आता मतपेटीवर मत नोंदवण्याची वेळ आली आहे. २१ तारखेला मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यात जनता कोणाची सत्ता आणणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या