राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणाऱ्या सोलापुरातील ‘या’ नेत्याला मिळणार विधानपरिषदेची संधी ?

blank

सोलापूर: राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी निवड येत्या महिन्यात केली जाणार आहे. राज्यातील सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांना प्रत्येकी ४ जागा वाट्याला येऊ शकतात. मात्र जास्त जागा मिळवण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. मात्र, या जागांसाठी उमेदवारांची निवड करताना इच्छुकांची संख्या जास्त असल्याने रस्सीखेच सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्षातील एकनिष्ठ आणि अडचणीच्या काळामध्ये पक्षाला उभारी देण्यासाठी काम केलेल्यांना संधी दिली जाणार असल्याचं बोलले जात आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी अनेकांनी पक्षाची साथ सोडली असताना पाटील हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ठाम राहिले. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्या नावाचा विचार व्हाया यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते आग्रही आहेत.

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या देखील नावाची चर्चा सुरु झाली आहे. संजीवराजे यांच्या कार्यकतृत्वाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी फलटणकरांच्यावतीने येथील पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी केली आहे.

दरम्यान, विधान परिषदेवर राज्यपालांकडून १२ जणांची नेमणूक केली जाणार आहे. क्रीडा, कला, सांस्कृतिक, साहित्य अशा क्षेत्रातील व्यक्तींसाठी असलेल्या या जागांवर बहुतांश वेळा सरकारने शिफारस केलेल्या व्यक्तींचीचं राज्यपालांनी नियुक्ती करण्याची पद्धत अलिकडे प्रचलित झाली होती. पण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांचे पालन करणारे असल्याने महाविकास आघाडीला आता नावे निवडताना सरकारमधील तीनही पक्षांची मोठी कसरत आहे.

पुणेकरांनो काळजी घ्या : कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा हजार पार

कोरोनामुळे अभिनेत्री आर्थिक अडचणीत, घर चालवायलाही नाहीत पैसे

‘या’ राज्याने कोरोनावर मिळवली मात, तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा भयावह