fbpx

कॉंग्रेसनंतर आता राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा करणार भाजपमध्ये प्रवेश?

टीम महाराष्ट्र देशा– गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणाऱ्या डॉ. पवार यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठीचे सर्व दरवाजे बंद झाल्याने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार या भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा करण्याचा मुहूर्त शोधल्याची चर्चा आहे. भारती पवार या माजी मंत्री दिवंगत ए. टी. पवार यांच्या सून आहेत.

दिंडोरी मतदारसंघातून त्या लोकसभेसाठी इच्छुक होत्या. पण, ऐनवेळी शिवसेनेतून आयात केलेल्या धनराज महाले यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पवार नाराज आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी त्या भाजपच्या गोटात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान,आगामी लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार पुनः सत्तेत येईल अशी शक्यता निर्माण झाली असून अनेक राजकीय नेते भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. असाच परिस्थितीचा अंदाज घेवून डॉ. भारती पवार या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत असल्याने त्याच दिवशी डॉ. भारती पवार भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यात रंगली आहे.

1 Comment

Click here to post a comment