राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्तांच्या मदतीला, पक्षाचे लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांना देणार 50 लाख

पुणे:  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, शासकीय पातळीवर सर्व मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून 50 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, तर कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. आजवर अनेकवेळा संकटे आली, तेव्हा शासकीय यंत्रणांनी प्रभावीपणे काम केले होते, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणा दिसत नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

‘प्रशासनाकडून मदत कार्य सुरु आहेचं पण सार्वजनिक तत्वावर देखील मदतीची गरज आहे. अनेक सेवाभावी संस्थांनी कोल्हापूर-सांगलीकडे धाव घेतली आहे. त्यामुळे शक्य होईल तितकी मदत करणे ही काळाची गरज आहे. आलेल्या आपत्तीमुळे शेती – फळबागांचे तसेच खासकरून दुधाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. म्हणून कोल्हापूर – सांगलीतील राज्य सरकारने शेतकऱ्यांना १०० % कर्जमाफी करावी’, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.

लई भारी ! कलम 370 हटवण्याचा निर्णयाचे राजा हरीप्रसाद सिहांच्या पुत्राने केले समर्थन

 

हि राजकीय कुरघोडीची वेळ नाही, सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल – मुख्यमंत्री

 

#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता