राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार- शरद पवार

sharad pawar

नांदेड: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले. शरद पवार हे नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर 17-19 ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होऊ शकते.

मुंबईत शिवसेने ला राष्ट्रवादी चा पाठींबा आहे का? या प्रश्नला शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मुंबईमहापालिके चा निर्णय तेथील स्थानिक पदाधिकारी घेतील. मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज आहे, असंही पवार म्हणाले.

मध्यावधी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी सज्ज : शरद पवार

मुंबईत भाजपचे 82, तर शिवसेनेचे 84, काँग्रेसचे 31, राष्ट्रवादीचे 9 उमेदवार  निवडून आले आहेत. शिवसेनेला 4 अपक्षांचा पाठिंबा मिळण्याने त्यांचे 88 उमेदवार झाले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीची महत्वाची भूमिका असेल.

दरम्यान शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं व्यक्तव काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केले होते.