‘सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को’, राष्ट्रवादीचा भाजपला सणसणीत टोला

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ठाकरे सरकारने कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरून चितपट करण्याचा मांडलेला डावही हाणून पडला. कर्जमाफीच्या पहिल्या यादित 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. तर कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर होणार म्हणून विरोधकांना पोटशूळ उठला असल्याचा टोला राष्ट्रवादी पक्षाने भाजपला लगावला आहे.

आज कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी विधानसभेत जाहीर होणार म्हटल्यानंतर आज सकाळपासूनच विरोधकांना पोटशूळ उठला. ‘सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को’, अशा आविर्भावात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे आमदार यांनी विधानभवनात प्रवेश करताच रंग दाखवला. असा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.

Loading...

तसेच विरोधकांनी विधानपरिषद सभागृहात जाणीवपूर्वक गदारोळ केला. या गोंधळातच पुरवणी मागण्या पटलावर मांडाव्या लागल्या आणि विधानपरिषदेचे कामकाज तेराव्या मिनिटालाच गुंडाळावे लागले. विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा होती. पण विरोधकांकडून झालेला गोंधळ विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला अशोभनीय आहे, अहि राष्ट्रवादीने यावेळी म्हंटले आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू असे सांगणाऱ्या फडणवीस सरकाने शेतकऱ्यांना फसवले नसते तर आज पायऱ्यांवर बसून रंग दाखवण्याची ही वेळ आली नसती, असा टोलाही यावेळी राष्ट्रवादीने भाजपला लगावला.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका