भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला फोडत राष्ट्रवादीने दिले भाजपला प्रत्युत्तर

बारामती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपच्या एका महिला नेत्याला फोडत प्रत्युत्तर दिले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर येथील महिला नेत्या डॉ. अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा प्रवेश होणार आहे. बारामती रयत भवन मार्केट यार्ड येथे आज दुपारी हा जाहीर प्रवेश होणार आहे.

डॉ. अर्चना पाटील यांनी या पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून केले आहे. इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गावचे पाटील घराण्याचा संपर्क इंदापूर तालुक्यामध्ये मोठा आहे. डॉ. अर्चना पाटील या (MBBS rediologist) आहेत. डॉ. पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक शंकरराव पाटील यांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी अतिशय चुरशीची निवडणूक झाली होती. दिनकरराव पाटील यांचा अवघ्या पाचशे मतांनी पराभव झाला होता.

दरम्यान, अर्चना पाटील यांच्या प्रेवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक सुशिक्षित तरुण चेहरा मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधासभा निवडणुकीत अर्चना पाटील यांचा पक्षाला निश्चित फायदा होणार आहे.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे पोस्टर जारी

सवलती नको आरक्षण मिळालं पाहिजे; धनगर समाज महासंघाची मागणी

भाजप-सेना युती होणारच नाही , जयंत पाटलांची भविष्यवाणी

भारताची पाकिस्तानला ऑफर, सफेद झेंडा घेऊन या दहशतवाद्यांचा मृतदेह घेऊन जा