पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – शरद पवार

पुणे: महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळत आहे, काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, तर कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. आजवर अनेकवेळा संकटे आली तेव्हा शासकीय यंत्रणांनी प्रभावीपणे काम केले होते, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणा दिसत नाही, असं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून 50 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राज्यावर ओढवले संकट पाहता पक्षाकडून काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा तूर्तास थांबवण्याची घोषणा पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसचे २४० जागांवर एकमत; मनसे, वंचितसोबत अद्याप बोलणी नाही

‘नाच्या’चं काम सोडून पाण्याचं बघा; अजित पवारांचा गिरीश महाजनांना सल्ला

अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यावर सोनिया गांधी नाराज, भर सभागृहात टाकला नाराजीचा कटाक्ष