सेतमधील मनमानी कारभाराला आळा घालण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी

पुणे : जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील सर्वच कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे.प्रत्येक दाखलल्यासाठी चारपट किंमत आकारली जात आहे. 33 रूपये दर असताना 100 ते 200 रुपये आकारले जात आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. सेतुमधल्या या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने कारवाई  करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऋतुराज देशमुख यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

जून महिन्यात शाळा महाविद्यालय सुरू होतात. त्यासोबत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची गडबड सुरू होते. त्यामुळे प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी सरकारी कार्यालयात गर्दी सुरू होते. वाढत्या गर्दीचा फायदा घेवून तहसील कार्यालयातील ही भ्रष्ट प्रक्रिया पण कार्यान्वित होते. विद्यार्थ्यांना लागणारे दाखले, कागदपत्रे काढून देण्यासाठी अक्षरशः विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांची ही लूट रोखण्यासाठी सरकारी पातळीवर काहीच प्रयत्न केले जात नाहीत. कागदपत्रे काढण्यासाठी सरकारी दरपत्रक असताना पैसे घेताना मनमानी पद्धतीने कार्यालयातील अधिकारी पैसै मागत आहेत.संगणकाची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत.अशी परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच सेतु कार्यालयात दिसत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

Loading...

या सगळ्यावर प्रशासनाने योग्य पाऊल उचलून कारवाई केली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देखील यावेळी प्रशासनाला देण्यात आला. यावेळी उत्तर सोलापूरचे रा.वि.कॉ तालुका अध्यक्ष अतिश बचुटे,अमोल शिंदे,सुमित सावंत,महेश शेंडगे, सुरज अभिवंत,बालाजी बचुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत