मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे भीक मांगो आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले. महापालिकेने मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली असल्याने त्यांना डिफॉल्टर ठरवल्यानंतर ही थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे आंदोलन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाचे साडेसात लाखांचे पाणी बिल थकवल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मिळावली आहे. विशेष म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांनीच पाणी बिल थकवले नसून, इतर मंत्र्यांच्याही शासकीय निवास्थानांची पाणी बिले थकलेली आहेत. दरम्यान महापालिकेने मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली असल्याने त्यांना डिफॉल्टर ठरवल्यानंतर ही थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर हे भीक मांगो आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी हे आंदोलन केले.

Loading...

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरी देश विदेशातून पाहुणे येत असतात. त्यामुळे हे पाहुणे आल्यावर पाण्याची कपात होऊ नये. तसेच मुख्यमंत्री नेहमी व्यस्त असतात त्यामुळे पाणी कपात होऊन आंघोळीला आणि तोंड धुवायला उशीर होऊ नये म्हणून मी बिल भरायला तयार आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली. तसेच जर राज्य सरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात येणाऱ्या पाण्याचे बिल भरण्याचे पैसे नसतील तर राज्यातील जनतेचं काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली